राजकीय

मौजवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा”

बीड — तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची असलेली मौजवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आली असून सदरील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे सरपंच पदी तेजाब मुक्ती राम चव्हाण तर उपसरपंच पदी जगताप आबा सयाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सदरील सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त अन्ना क्षीरसागर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक बाप्पू खांडे यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी सरपंच म्हणून तेजाब मुक्तीराम चव्हाण तर उपसरपंच म्हणून जगताप आबासाहेब यांची निवड करण्यात आली आहे ग्रामपंचायत सदस्य श्री जाधव अनिल तुकाराम व श्री ढेंबरे लक्ष्मण भगवान यांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी सहकार्य केले यावेळी मौजवाडी गावातील नागरिकांनी आपल्याला विधानसभा, लोकसभाआशा प्रत्येक निवडणुकीमध्ये भरघोस अशाप्रकारे सहकार्य केले आहे त्या सहकार्याची उतराई म्हणून गावाच्या विकासासाठी मौजवाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्याचा मानस अण्णांनी व्यक्त केला यावेळी गावातील माजी सरपंच जाधव रामनारायण मनोहर,माजी सरपंच जाधव बाळु बापूराव ,माजी सरपंच कासकर रामदास कचराप्पा, माजी सरपंच जाधव कमलाकर ,माजी उपसरपंच संभाजी ढेम्बरे,दिलीप जगताप तसेच बन्सड रमेश बन्सी, जगताप बिबीशन राधाकिसन, चव्हाण पप्पू भास्कर, बन्सड रामभाऊ सत्यभान, ढेंगे बाबू भाऊसाहेब,ढेंगे त्रिंबक कान्हु, संभाजी ढेंबरे, सचिन जाधव, मधुकर मुळे कृष्णा जाधव,उत्तरेश्वर जाधव, किशोर जाधव, सुभाष चव्हाण,बाबासाहेब चव्हाण, राजेंद्र चव्हाण, सुदर्शन चव्हाण इत्यादी गावातील प्रमुख व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून विकास कामात कुठल्याही प्रकारचा राजकारण करणार नाही असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त अन्ना क्षीरसागर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलीक बापू खांडे,अरुण डाके,ऍड राजेंद्र राऊत यांनी नूतन सरपंच आणि उपसरपंच यांना दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close