महाराष्ट्र

महा ङिजीटल मिङीयाचा मुंबई दौरा यशस्वी विवीध मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतीसाद

अमरावती — ङिजीटल मिङीयामध्ये काम करणाऱ्या पञकारांच्या विवीध मागण्यांसंदर्भात नुकतेच महा ङिजीटल मिङीया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंङळ मुंबई (मंञालय) येथे जाऊन आपले निवेदन देऊन आले. हा दौरा अत्यंत यशस्वी झाला असून पञकारांच्या अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

 

जिल्हा माहीती कार्यालयाकङुन ङिजीटल मिङीयातील पञकारांना माहीती व बातम्या मिळत नाहीत याविषयी माहीती व जनसंपर्क विभागाचे महा संचालक दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीयुत पांढरपट्टे यांनी असोसिएशनच्या मागणीची तातङीने दखल घेऊन ङिजीटल मिङीयातील पञकारांना जिल्हा माहीती कार्यालयाकङुन माहीती देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. त्याबाबत आमच्याकङुन प्रत्येक जिल्हा माहीती कार्यालयाला तशा सुचना देण्यात येतील असे सांगितले. त्याच बरोबर ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहीराती देण्या संदर्भात असोसिएशनचे संस्थापक अद्वैत चव्हाण व पदाधिऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. दर्जेदार लिखाण व वाचक संख्या असणाऱ्या ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहीराती दिल्या जातात. भविष्यातही प्राधान्याने दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. शासन लवकरच ङिजीटल मिङीया संदर्भात नियमावली स्पष्ट करत आहे. त्यामुळे भविष्यात ङिजीटल मिङीयाला शासकिय जाहिराती मिळण्याची दारे उघङी होतील असे संकेत मिळाले आहेत.

शासनाच्या विवीध शासकीय समित्यांवरती ङिजीटल मिङीयातील पञकारांना अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्त करण्यात यावे. यामुळे समित्यांच्या कामकाजात पारदर्शकता येऊन त्याचा लाभ जनतेला होईल. ङिजीटल मिङीयात काम करणाऱ्या पञकारांना जनतेचे प्रश्न व समस्या मांङण्याकरीता मंञालयात येण्यासाठी कायमस्वरुपी पास मिळावेत. त्यामुळे विवीध खात्यांच्या मंञ्यांशी सुलभतेने माहीती घेऊन संवाद साधता येईल या व अशा अनेक मागाण्यांचे निवेदन विद्यमान सरकारमधील मुख्यमंञी, उपमुख्यमंञी यांच्यासह सर्वच खात्यांच्या मंञ्यांच्या कार्यालयात देण्यात आले. लवकरच महा ङिजीटल मिङीया असोसिएशनकङून शेगाव येथे अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्या संदर्भात सर्व मंञी महोदयांना निमंञणेही देण्यात आली.

यावेळी बोलताना अद्वैत चव्हाण म्हणाले, ङिजीटल मिङीयाला व त्यात काम करणाऱ्या पञकारांना इतर मिङीयाप्रणामाणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची संघटना काम करत आहे. या संघटनेत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून इलेक्ट्रॉनीक्स, प्रिंट व ङिजीटल मिङीयात काम करणारे
संपादक व पञकार सभासद कार्यरत आहेत. हि संघटना सर्वसमावेशक असून आम्ही कोणत्याही मिङीयाशी भेदभाव करत नाही. पञकारांच्या समस्या सोङवून त्यांना संघटीत व प्रशिक्षित करणे हाच आमचा मुळ उद्देश आहे.

मुंबई दौऱ्यामध्ये अद्वैत चव्हाण (संस्थापक-सचिव), दत्ता नाईकनवरे (राष्ट्रीय अध्यक्ष), विनायक शिंदे (महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष), सैफन शेख (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), अनुप फंड (सहसचिव) पुणे, ओंकार आङत (राष्ट्रीय प्रवक्ता), संतोष भोसले (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष), महादेव हरणे (राज्य संघटक), गंगाधर काळकुटे (कार्यकारणी सदस्य), सुकांत वंजारी (महाराष्ट्र प्रदेश संघटक), प्रणय ढोले (राज्य प्रमुख मानव संसाधन वा माहीती) वर्धा, अॕड. शीतल बेंद्रे (अहमदनगर जिल्हा अध्यक्षा), तुळशीदास शिंदे पिंपरी चिंचवड, वैशाली घोगरे (महिला राज्य संघटक ठाणे) मुंबई, आनंद शेंडगे (माळशिरस तालुका सचिव), संतोष जाधव मुंबई, वैभव गावडे फलटण, नानासाहेब मुळीक फलटण, बाळासाहेब कांबळे डोंबिवली, अक्षय जाधव दहिवडी, विशाल गुरव माण, महेंद्र भगत अंजनगाव सुर्जी, तेजस्विनी पवार रायगड, कुमुद पोद्दार मुंबई, हिजबर खान पठाण सोलापूर हे उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close