महाराष्ट्र

‘मी जबाबदार मोहीम’यशस्वी बनवली नाही तर आठ दिवसात लाॅक डाऊन –ठाकरे

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (रविवारी) जनतेशी संवाद साधला. त्यांनी यापुर्वी शासनाने राबविलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची आठवण करून देत आपण आता मी जबाबदार ही मोहिम सर्वांनी राबवावी असे आवाहन केले आहे. वर्क फ्रॉर्म होमवर भर द्या असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारला. या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 8 दिवसांमध्ये मिळेल. मास्क घाला अन् लॉकडाऊन टाळा असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वांनी मी जबाबदार ही मोहिम यशस्वी बनवली नाही तर लॉकडाऊनचा पर्याय समोर येण्याची शक्यता देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

महत्त्वाचे मुद्दे –

* सुमारे 9 लाख कोविड योध्दांना कोरोनाची लस दिलेले आहे. कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.
* आपण सर्वांनी बेधडकपणाने जाऊन आपण जाऊन लसीकरण करून घ्या.
* लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकार ठरवतंय.
* आणखी एक-दोन कंपन्या आपल्याला व्हॅक्सीन देणार आहेत. त्यानंतर आपण जनतेसाठी लसीकरणाचा कार्यक्रम खुला करणार आहोत.
* शिवभुमीवर (शिवनेरी) जाणं आणि शिवरायांना वंदन करणे हे कर्तव्यच.
* कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल आहे. त्यामुळे मास्क वापरणे हे गरजेचे आहे. मास्क घालणं अनिवार्य आहे. लस घेण्यापुर्वी अन् लस घेतल्यानंतर देखील मास्क घालणं गरजेचं आहे.
* डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थेचे स्वंयसेवक देवदूतासारखे धावून आले.
* आज राज्यातील टेस्टींग लॅबची संख्या 500 पर्यंत गेली आहे.
* आपण महाराष्ट्र पुढे नेला. आपण कोविड काळात देखील आपण सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे.
* कोरानाची दुसरी लाट आपल्या राज्यात आली की नाही हे एक-दोन आठवडयात आपल्याला समजेल.
* दुकान, हॉटेल्सच्या वेळा केवळ गर्दी होऊ नये म्हणून वाढवून दिल्या आहेत.
* कोरोनाची शिस्त पाळायलाच हवी आहे. पण अलिकडे थोडी ढिलाई झाली आहे.
* पाश्चिमात्य देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन केलाय.
* मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घरचा समारंभ कोविडच्या प्रादुर्भावामुळे रद्द केला.
* मुंबई आणि इतर शहरांमध्ये मोठ-मोठे हॉल आहेत. तिथं देखील काही नियमांचं उल्लंघन झालं तर तेथील संबंधितांवर कारवाई करणार आहोत.
* विना मास्क फिरणार्‍यांना दंड ठोठावणार.
* आता लॉकडाऊन केवळ कागदावर आहे. पण आता तसं चालणार नाही. बंद पडलेल्या अर्थचक्राला गती देत असताना पुन्हा कोरोनाचं संकट आलं. सर्व गोष्टी आपल्याला सुरू हव्यात पण त्यासाठी शिस्तीची गरज आहे.
* आज आपल्या राज्यात सुमारे 7 हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
* आठवडयाभरापुर्वी वातावरण थोडं चांगलं होतं. ते केवळ तुमच्या आणि कोविड योध्यांमुळं शक्य झालं होतं. त्यांनी आहोरात्र मेहनत घेतली तर काही जणांनी स्वतःचे जीव देखील गमावले. या युध्दामध्ये शहीद झालेल्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातंय. कोविड योध्यांचा सत्कार करताना आणखी कोविड योध्दे निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे.
* कोविड योध्दे नाही झालात तरी चालेल पण कोविड दूत तरी बनू नका.
* अमरावतीमध्ये आज तिथं एक हजारच्या आसपास नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे परिस्थिती खुपच वाईट आहे.
* आज आपण दिरंगाई केली तर येणारं शिखर किती असू शकेल याची कल्पनाच करू नये.
* डॉ. राजेश टोपे, जयंत पाटील, बच्च कडू, शिंगणे हे देखील कोरोना बाधित झाले आहेत.
* राज्यात आता 53 हजार कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.
* अचानक लॉकडाऊन करणे घातक आणि अचानकपणे उघडणं घातक आहे.
* अकोला, अमरावती, वाशिममध्ये परिस्थिती गंभीर बनत आहे.
* शासकीय कार्यक्रम झूम मिटींगच्या माध्यमातून
* सार्वजनिक निवडणूका, मोर्चे, आंदोलने, यात्रांवर बंदी.
* पक्ष वाढवूया पण कोरोना नको वाढवायला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close