देश विदेश

नैसर्गिक आपत्तीत सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे; उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी

मुंबई — अतिवृष्टी झाली तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पात्र ठरवले जाते ‌ ही चुकीची पद्धत असून सततचा पाऊस किंवा अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले पाहिजे. याबरोबरच नुकसान भरपाई चे एनडीआरएफचे निकष देखील 2015 चे आहेत. हे बदलण्यासाठी केंद्राने पावले उचलण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे ‌
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निती आयोगाची सहावी बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची पिक जमीनदोस्त झाली. त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत आणखी बदल होण्याची आवश्यकता आहे कारण पीक विमा योजनेतून कंपन्यांना अधिक फायदा होतो त्या प्रमाणात शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळत नाही. विमा कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा हा पुन्हा सरकारला मिळाला पाहिजे त्यांचा नफा आणि नुकसानीचे प्रमाण निश्चित करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचं सांगितलं ‌ विमा योजनेतून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे
अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली
पर्यावरण बदलामुळे आता आपल्याला देशाच्या शेती क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले. पर्यावरण बदलामुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशात इतरत्रही फटका बसत आहे हे सांगताना त्यांनी उत्तराखंड येथील नुकत्याच झालेल्या आपत्तीचे उदाहरण दिले. आपण विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतो पण त्या बऱ्याच प्रमाणात आर्थिक लाभाच्या किंवा कर्जाशी संबंधित असतात. पर्यावरण बदलाच्या अनुषंगाने माध्यमांतून प्राधान्याने चर्चा होणे व त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आपल्याला बदलत्या वातावरणानुसार शेतीची पद्धतही बदलावी लागेल, असे ठाकरे म्हणाले.
पीक पद्धतीत वैविध्य असणे गरजेचे आहे. एकेकाळी सफरचंद म्हणजे काश्मीरची ओळख होती. जसे कोकणातच हापूस आंबा व्हायचा पण आता इतर देशांतूनही फळे येऊ लागली आहेत. आपण देखील फळांमध्ये आणि पिकांमध्ये त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी काही मूलभूत बदल करू शकतो का ते पाहण्याची गरज आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close