देश विदेश

भाजपचा उत्तर मुंबईचा पदाधिकारी बांगलादेशीच, पोलिसांनी केली अटक

मुंबई — घुसखोरीच्या मुद्यावरून भाजप नेहमीच इतर पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते. मात्र उत्तर मुंबई मध्ये अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशचे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
उत्तर मुंबई च्या अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष रुबेल जोनू शेख हा बांगलादेशी असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवले आहे.अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. रुबेल हा भाजपाचा पदाधिकारी असून या पक्षाने कोणतीही शहानिशा न करता त्याला पद कसे दिले. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काही समाज विघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का? असा प्रश्न सुध्दा महेश तपासे यांनी उपस्थित केला होता. तसेच ही बाब गंभीर स्वरुपाची असल्याने याची चौकशी करण्याबाबतचे निवेदन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी याचा तपास केला असता चौकशीदरम्यान त्यांच्या घरात प. बंगाल राज्यातील मलापोटा ग्रामपंचायत, जिल्हा – २४ उत्तर परगणा येथील ग्रामपंचायत रहिवाशी दाखला तसेच बोलगंडा आदर्श हायस्कूल जिल्हा – नादिया येथील शाळा सोडल्याचा दाखला मिळाला होता. पोलिसांनी मलापोटा ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी केली असता रुबेल जोनू शेख याचा नावाचा कोणताही रहिवाशी दाखला देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्याचीी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close