महाराष्ट्र

पुन्हा शाळा बंद होणार? मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई — राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता आहे
मुंबई ठाणे या जिल्ह्यातील शाळा अजून सुरू झालेल्या नव्हत्या तसेच यवतमाळ अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे येथे संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद अमरावती यवतमाळ या ठिकाणच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेता राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने सोमवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड पालकांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा विचार सुरू असला तरी पुढे परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या परीक्षा संदर्भात देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close