देश विदेश

बांगलादेशी घुसखोरास दिले पद ? महाराष्ट्रातील भाजप अडचणीत

मुंबई — बांगलादेशातून घुसखोरी करत मुंबईत येऊन राहिलेल्या एकास भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्षपद देण्यात आल्याचा आरोप होत असल्यामुळे भाजप पहिल्यांदाच घुसखोरीच्या मुद्यावरून अडचणीत सापडला आहे.
बांगलादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष केल्याची माहिती पोलीस धाडीत समोर आली असून भाजपवर बांगलादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की का आली, याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.यासंदर्भात तक्रार करण्यासाठी एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच भेट घेतली. एखादा राजकीय पक्ष आपल्या महत्त्वाच्या पदावर बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या तरुणाला कशी संधी देऊ शकतो, असा प्रश्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गृहमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तपास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीकडून भाजपला टार्गेट केलं जाईल, असं दिसत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close