क्राईम

37 हजाराची लाच घेताना गट विकास अधिकारी पकडला

बीड — मनरेगांतर्गत खोदलेल्या सार्वजनिक विहिरी चे बिल मंजूर करण्यासाठी 37 हजार रुपयांची लाच मागणारा गट विकास अधिकारी नारायण मिसाळ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैसे स्विकारताना रंगेहात पकडले.
नारायण मिसाळ यांच्याकडे बीड व पाटोदा पंचायत समिती गट विकास अधिकारी पदाचा पदभार आहे. पाटोदा तालुक्यात तक्रारदाराने सार्वजनिक विहिरी चे खोदकाम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी गट विकास अधिकारी नारायण मिसाळ याने तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दरम्यान पडताळणी करत असताना तडजोडी अंती 37 हजार रुपये देण्याचे ठरले. बुधवारी रात्री नगर रोडवर असलेल्या मिसाळ यांच्या घरी लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close