राजकीय

धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर

धनंजय मुंडेंनी केले अभिनंदन तर वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते सत्कार

परळी  — ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या निकालानंतर सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर आज तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

तालुक्यातील सरफराजपुर, वंजारवाडी, रेवली, मोहा व लाडझरी या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले असून, आज परळी येथील त्यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

सरफराजपुरच्या सरपंचपदी सौ. मीराताई रमेश राठोड तर उपसरपंच पदी अंगद घाडगे यांची निवड झाली आहे; तर सुमंत घाडगे, सौ. भाग्यश्री भगवानराव घाडगे, सौ. वर्षा अरुण घाडगे हे सदस्य म्हणून निर्वाचित झालेले आहेत. बाळासाहेब घाडगे व प्रदीप घाडगे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. रेवलीच्या सरपंचपदी सौ. रेखाताई मनोहर केदार तर उपसरपंच पदी सौ. शकुंतला रतन कवडे यांची निवड करण्यात आली. तर सौ. सुनीता कांदे, शेषेराव बनसोडे, सौ. कांताबाई उपाडे, वैजनाथ कांदे, अण्णासाहेब मोटे हे सदस्यपदी निवडून आलेले आहेत.

वंजारवाडीच्या सरपंचपदी सौ. सत्वशीला दराडे तर उपसरपंच पदी गणपत राठोड यांची निवड करण्यात आली आहे. तर सुरेश दराडे, सुखदेव पवार, गवळणबाई पवार, शशिकलाबाई राठोड व लताबाई डोईफोडे या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.

परळी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या ग्रामपंचायतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या मोहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. रुक्मिणीबाई पांडुरंग शेप व उपसरपंच पदी संदीप रामकृष्ण देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर सौ. शिला उद्धव शिंदे, हरिभाऊ शिंदे, सौ. मीराबाई संग्राम देशमुख, कुशावर्ताबाई शिंदे ह्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

त्याचबरोबर लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी शिरीष नाकाडे यांची तर उपसरपंच पदी सौ. मंगलाबाई व्यंकटराव मुंडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राजाराम मुंडे, सौ. संगीता महादेव मुंडे, रुक्मिणीबाई परमेश्वर चाटे, विठ्ठल कांबळे, भारतबाई गोमसाळे, सरस्वती वैजनाथ मोटे या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

गावातील गटतट विसरून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसेच नवनिर्वाचित सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे असा मोलाचा सल्लाही ना. धनंजय मुंडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close