महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख पुन्हा अडचणीत; पीडितेचा आत्महत्येचा इशारा

पुणे — पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला मला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरूणीने म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी यावेळी केला.
काय आहे प्रकरण ?
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला होता. मात्र मेहबूब शेख यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. मात्र आता पीडित तरूणीने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.दरम्यान, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना शेख यांनी आपण निर्दोष असून आपली नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी मेहबूब शेख यांना पत्रकार परिषदेत रडू आलं होतं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close