देश विदेश

टूलकिट प्रकरणी शंतनु मुळूक यास न्यायालयाचा दिलासा

बीड – टूलकिट प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला बीडचा आरोपी शंतनु शिवलाल मूळूक यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दहा दिवसांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ग्रेटा थनबर्ग हिने पाठवलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गंभीर दखल घेत पर्यावरणवादी दिशा रवी या तरुणीला अटक केली. याप्रकरणी निशा जॅकॉब आणि शंतनु मुळूक यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी बीड येथे येऊन शंतनू शिवलाल मुळूक च्या घराची झाडाझडती घेतली .त्याच्या आई वडिलांची देखील चौकशी केली.
यावर शंतनू मुळूक यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. याची सुनावणी न्या. विभा कंकणवाडी यांच्यासमोर झाली.दिल्ली येथील नायालयात हजर होऊन दाद मागण्यासाठी शंतनू याला 10 दिवसाचा ट्रान्झिट जमीन मंजूर केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close