क्राईम

पुन्हा त्याच विहिरीत कोसळली आणखी एक कार, माय-लेकीचा मृत्यू

जालना — जालना देऊळगाव राजा रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज पुन्हा कार कोसळली या अपघातात माय लेकीचा मृत्यू झाला तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले. दोन दिवसापूर्वीच बीड येथील कार या विहिरीत कोसळली होती या दुर्घटनेत देखील दोन जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील सिंगडोह गावातील गोपाल विठ्ठल फांदडे (वय ४०, कार चालक) जय गुणवंत वानखेडे (१७), आरती गोपाल फांदडे (३५), मुलगी माही गोपाल फांदडे (५) आणि वेदिका फांदडे (१ वर्ष ६ महिने) हे कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. ते सर्व आपले काम आटोपून आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद येथून जालना मार्गे वाशिमकडे जाण्यासाठी कारमधून निघाले होते. यावेळी जामवाडी येथे जालना-देऊळगावराजा मार्गावर कार आली असता एका ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिली. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यापासून दहा फूट असणाऱ्या विहिरीत कोसळली.

दरम्यान, आपली कार विहिरीत पडणार, आपण आता बचावणार नाही. पण आपली बाळ बचावलं पाहीजे हे लक्षात येताच आई आरती हिने दीड वर्षाच्या चिमुकली वेदिकाला खिडकीतून बाहेर फेकले. त्यामुळे ती वाचली आहे. मात्र कार विहिरीत पडल्याने पाण्यात बुडूण आई आरती आणि मोठी बहिण माही या मृत्यू झाला आहे. कार विहिरीत पडल्यानंतर कार चालक गोपाल फांदडे आणि जय गुणवंत वानखेडे हे दोघेजण पोहत वर आले. त्यानंतर त्यांनी जाणाऱ्या-येणाऱ्यांना आवाज देत मदतीची याचना केली.

दरम्यान, या अपघाताची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्याचदरम्यान ही माहिती पोलिसांही मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून तब्बल दोन ते तीन तासानंतर कार विहिरीतून बाहेर काढली. यावेळी कारमध्ये आरती फांदडे आणि मुलगी माही फांदडे यांचे मृतदेह आढळून आले आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close