आपला जिल्हा

वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा– नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीड — कोरोना महामारी चे संकट अजून पूर्ण संपलेले नाही अशा काळात आजही गोरगरिबांना मदत करणे गरजेचे आहे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा कुठलीही बॅनरबाजी अथवा गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे

या वर्षी कोरोनाचे मोठे संकट देशावरच नव्हे तर जगावर ओढवले आहे अनेक गोरगरिबांना शेतकऱ्यांना कामगारांना आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आपल्या मार्फत शक्य होईल तेवढी मदत आपण केलीच आहे मात्र आता माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा केल्यास मला आनंदच होईल बीड शहरातील गरजू आणि गरीब लोकांना आजही मदतीची गरज आहे अशा वेळी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी किंवा मोठ्या गर्दीचे कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन करुण नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन केले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close