आपला जिल्हा

पूर्वकल्पना न देता कृषी पंपाची वीज तोडली;आ. लक्ष्मण पवारांचे उपोषण सुरू

गेवराई — रब्बी हंगामातील पिके ऐन भरात असतानाच, ठाकरे सरकारच्या विद्युत विभागाने कोणतीच पूर्व सूचना न देताच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, जो पर्यंत विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपण विद्युत कंपनीच्या कार्यालय परिसरातून जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी शनिवार ता. 13 रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

आमदार पवार यांनी विज बिलाचे पैसै भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन, केवळ
आम्हाला दहा दिवस मुदत द्या, अशी मागणी केली. मात्र, मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आठमुठे धोरण ठेवले.
आघाडीचे सरकार भाजपा मित्र पक्षाच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करत असल्याचा गंभीर आरोप आमदार पवार यांनी केला आहे. दरम्यान, आमदार लक्ष्मण पवार यांनी उपोषणाचा इशारा देताच चार दिवसापूर्वी बंद केलेले गावठाण फिड्डर सुरू केले आहे.यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडके, सभापती दीपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर, पं. स.सदस्य जगन आडागळे नगरसेवक राहुल खंडागळे, ऍड.भगवान घुंबार्डे, भरत गायकवाड, अजित कानगुडे,जानमोहमद बागवान, समाधान मस्के,भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, करण जाधव, बाळासाहेब गायकवाड, पुरुषोत्तम दाभाडे, शेख बदुयोद्दीन, शेतकरी नेते नानासाहेब पवार, हिरापूरचे सरपंच अमोल तिपाले, सरपंच शिवाजीराव शिंगाडे, कैलास पवार, शेख मोहंमद, हिरापूरचे संतोष मुंजाळ, नितीन शेटे,रामप्रसाद आहेर, ब्रम्हदेव धुरंधरे, विठ्ठल मोटे, सुंदर धस, विनोद निकम, मातीन कुरेशी, गणेश मुंडे, मंजूर बागवान, सय्यद युनूस, शेख अब्दूलभाई, अशोक गोरे, शेतकरी रामराव मोहळकर, कृष्णा संत, प्रकाश शिंदे,हरीश वडघणे, सुरेश डाके, विनोद आहेर,रामनाथ महाडिक,उद्धव साबळे, प्रकाश गाडे, कृष्णा राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आ.लक्ष्मण पवार यांनी घेतला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close