महाराष्ट्र

मराठवाडयात 17,952 कोटी रूपये थकबाकी, विज बिल भरण्याचे महावितरणचे आव्हान

      • वीज बिलाच्या 30 हजार ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा

औरंगाबाद — कोरोना विषाणूच्या प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडावून घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसहय केले. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात वीज बिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीज पुरवठा थकीत वीजबिलापोटी खंडित केला नाही. मराठवाडयातील 26,03,129 ग्राहकांकडे  17,952 कोटी रूपये थकबाकीचा डोंगर आहे.

     मराठवाडयात पूर्वीपासून व कोरोना संकटाच्या लॉकडाउननंतर बहुतांश ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले. औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती,व्यापारी, औघोगिक, सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे, कृषी व इतर वीज ग्राहकांकडे जानेवारी  2021 अखेर पर्यंत 17,952 कोटी रूपये थकबाकी आहे.  महावितरणने वीज बिलाची वसुलीसाठी कोरोना काळामुळे  ग्राहकांना फोनद्वारे सूचना, एसएमएस, ईमेलद्वारे विनंती, पत्रव्यवहार करून संपर्क साधण्यात आलेला आहे.

महावितरण कंपनी ही  महानिर्मिती कंपनीसह खाजगी वीज निर्मिती कंपनीकडून वीज विकत घेते. ही वीज महापारेषण कंपनीकडून महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रापर्यंत पोहचविली जाते. नंतर महावितरण कंपनीकडून ही वीज वीज ग्राहकांपर्यंत पोहचविली जाते.  वीज खरेदीपोटी व वहन खर्चाचे पैसे दरमहा या कंपन्यांना दयावे लागतात. बॅकांचे कर्ज व व्याजाचे देणे, महावितरणचा व्यवस्थापनाचा खर्च करावा लागतो.  वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे दरमहा महावितरणकडे भरणा न केल्यास वीज खरेदी करणे कठिण होवू जाते. अशा परिस्थितीत महावितरणला वीज विकत घेणे व आपला आर्थिक गाडा चालविणे कठिण झालेले आहे.तसेच महावितरणला ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.कोरोनाकाळासह आधीपासून मराठवाडयातील जनतेचे वीज बिल भरण्याकडे उदासिनता दिसून येते. कोरोना काळानंतर काही वीज ग्राहकांनी पूर्णपणे  वीज बिल भरणा करणे बंद केल्यामुळे मराठवाडयात थकबाकीचा डोंगर तयार झाला आहे.

    मार्च महिन्यात लॉकडावून झाल्यानंतर वीजबिल भरणा—या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. महावितरणने ग्राहकांना दिलासा देत बिलाचे हप्ते पाडून देण्यात येत आहेत.  महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरघ्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष, लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी बिल दुरूस्तीसाठी व्हॉटसअॅप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस, वीज बिल तपासणीसाठी वेब लिंक आणि वीज बिलावर बिलाची संपूर्ण माहिती आदी उपाय योजना करण्यात येत आहेत.

मराठवाडयात वीज बिलाची थकबाकी

 परिमंडल    घरगुती,       इतर       पाणी पुरवठा       पथदिवे             कृषीपंप
वाणिज्यिक,
औघोगिक

औरंगाबाद    388.71       10.06       78.03         366.59           4512.29

लातूर       394.39        11.42       288.58        795.99          5698.08

नांदेड      511.17        10.71        178.92       518.09          4189.07

प्रादेशिक    1294.27       32.73        545.81       1680.67        14399.44
कार्यालय
एकूण

मराठवाडयात एक गाव एक दिवस उपक्रमात वीज बिलाच्या 30 हजार ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच वीज बिलासंबंधी तक्रार असल्यास जवळच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. वीज ग्राहकांनी  वीज देयकाचा आॅनलाईन, महावितरणच्या अधिक्रत वीज भरणा केंद्रावर बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close