आरोग्य व शिक्षण

आरटीई पोर्टलवर इंग्रजी शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ

शाळा नोंदणी नंतर पालकांना अर्ज करता येणार – मनोज जाधव

बीड — शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्याना मोफत प्रवेश मिळावा या साठी आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला दी १५ फेब्रुवारी पर्यंत मुद्दत वाढ देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल ,वंचित , दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा याकरिता एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात . पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे .त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या.त्यानुसार शाळा नोंदणीसाठी ८ फेब्रुवारी अशी अंतिम मुदत होती . त्या नंतर दी. १० आणि आता १५ फेब्रुवारीपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली असून बीड जिल्ह्यात १४ फेब्रुवारी सकाळ पर्यंत १५८ शाळांची नोंदणी झाली आहे. गत वर्षी जिल्ह्यात २२९ शाळांच्या नोंदी आरटीई पोर्टलवर झाल्या होत्या. शाळा नोंदणी पूर्ण झाल्या नंतर पालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येतील. असे शिवसंग्रामचे नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी म्हंटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close