ब्रेकिंग

उत्तर भारत भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला

नवी दिल्ली — दिल्ली ,जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश,पंजाब ,हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान उत्तराखंड या राज्यांना रात्री साडेदहाच्या सुमारास तिव्र भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू तजाकिस्तान मध्ये आहे.दरम्यान जीवित वा वित्तहानी ची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्लीत जोरदार झटके जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल आहे. देशातील पाच राज्यांसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये देखील भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहे. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, भूकंपाची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही यूजर्सनी भूकंपाचे विविध फोटो शेअर केले आहेत. एका यूजरने जम्मू-काश्मीरमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तर एकाने उत्तर भारतातील एका घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये जीवित व वित्त हानी किती झाली यासंदर्भात माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close