देश विदेश

देशातला पहिला सीएनजी ट्रॅक्टर उद्या लॉन्च होणार

नवी दिल्ली — स्कूटर, कार आणि बसनंतर आता CNG फिटेड ट्रॅक्टरही येत आहे. त्यामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. CNG ट्रॅक्टर उद्या (शुक्रवार) लाँच केला जाणार आहे. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांची इंधनावर होणाऱ्या खर्चात 50 टक्के बचत होणार आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पण CNG ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यानुसार, स्कूटर, कार आणि बसनंतर आता CNG फिटेड ट्रॅक्टरचा फायदा होणार आहे. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राजमार्गमंत्री नितीन गडकरी हे उद्या सायंकाळी 5 वाजता CNG फिटेड ट्रॅक्टर लाँच करणार आहेत.
या निमित्ताने पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅसमंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते, परिवहन आणि राजमार्ग राज्यमंत्री व्ही. के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

CNG कन्वर्जनचे होतील फायदे

रावमेट टेक्नो सोल्यूशन आणि टोमेसेटो अचीले इंडियाच्या माध्यमातून ट्रॅक्टरचे CNG कन्वर्जन केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल. या CNG ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल. डिझेलच्या तुलनेत CNG ट्रॅक्टरचे मायलेज जास्त असेल.

CNG ट्रॅक्टरमध्ये अधिक पॉवर

डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत CNG ट्रॅक्टरमध्ये अधिक पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत CNG 70 टक्के कमी वापर होतो. CNG ट्रॅक्टरचा वापर केल्याने 50 टक्क्यांपर्यंत इंधनमध्ये बचत होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close