आपला जिल्हा

हॉस्पिटलच्या शौचालयात सापडले मृत अर्भक

बीड — जालना रोडवर असलेल्या वीर हॉस्पिटल च्या स्वच्छता गृहात पुरुष जातीचे अर्भक सापडल्या ची घटना आज घडली.
शहरातील जालना रोडवर वीर हॉस्पिटल आहे. येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेडिकलवर कामाला असणारे ओमप्रकाश शेटे हे वाहन पार्किंगमधील सार्वजिनक शौचालयात गेले. त्यांना येथे एक अर्भक दिसले. त्यांनी ही माहिती डॉ.संजय वीर यांना दिली. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले
सदरील अर्भक पुरुष जातीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. टॉयलेटमध्ये अर्भक कसे आले याचा तपास सुरू आहे. दरम्यान एक महिला रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती.बाथरूममधून आल्यानंतर ती महिला परत घरी गेल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नेमका प्रकार काय हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close