महाराष्ट्र

आता यापुढे व्हीटीएस सिस्टीमुळे तुम्हाला बसचे लोकेशनही कळणार चक्क मोबाईलवर !

✍️ मोहन चौकेकर

मुंबई — आता प्रवाशांची ही चिंता मिटणार आहे. कारण तुमची लालपरी कोणत्या ठिकाणी आहे? हे लोकेशन तुम्हाला एका क्लिकद्वारे मोबाईलवर कळणार आहे.राज्यातील सर्वच बसेसमध्ये व्हीटीएस म्हणजेच व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या नव्या प्रणालीमार्फत एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली? बस येण्यास किती वेळ लागेल? याची माहीती मोबाईलवर समजणार आहे.

कोणत्या-कोणत्या गोष्टी कळणार?

अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने प्रवाशांना जवळची बसस्थानकं, त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या बसेसची माहिती, बस कोणत्या स्थानकावर पोहोचली आहे.

बस कोठे पोहोचली आहे. बसचा वेग किती आहे. बस कोणत्या आगामी स्थानकावर थांबणार आहे. बस कोणत्या मार्गाने जात आहे, याची माहिती देखील प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close