आपला जिल्हा

थंडीपासून बचावासाठी त्याने चक्क नोटांची केली शेकोटी

महोबा — सध्या थंडीचा कडाका सुटल्यामुळे थंडी पासून बचाव करण्यासाठी केले जातात. लाकूड केर कचरा यांची शेकोटी देखील केली जाते मात्र उत्तर प्रदेशातील एका मनोरुग्णाने लाखो रुपयांची शेकोटी करून थंडीपासून बचाव केल्यामुळेच अनेक जण हा प्रकार ऐकून हैरान झाले आहेत.
महोबा शहर कोतवाली भागात असलेल्या जुनी भाजी मंडई परिसरात एक मनोरुग्ण व्यक्ती राहतो. त्याने थंडीपासून वाचण्यासाठी चक्क ५००-५०० रूपयांच्या नोटांना आग लावली. बुंदेलखंडसारख्या भागात गरीब लोक मोठ्या प्रमाणात राहतात. अशात तिथे अशी घटना घडल्याने सगळेच हैराण झाले आहेत.


आजूबाजूच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लाखो रूपयांनी नकदी रक्कम, २ अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसहीत एका धारदार शस्त्रही आगीत पेटवून दिलं.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लाखो रूपयांच्या नोटा जाळणारी ही व्यक्ती नंतर हसत होती आणि म्हणत होती की, काय करू, मला थंडी लागत होती, जे मिळालं ते जाळून थंडीपासून स्वत:चा बचाव केला.
या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलीस या घटनेचा वेगवेगळ्या अ‍ॅंगलने विचार करत आहेत. पण आता प्रश्न हा उपस्थित राहतो की, या मनोरूग्ण व्यक्तीकडे इतके रोख रक्कम आली कुठून? या अजब घटनेवर पोलीस आणि प्रशासन काहीही बोलण्यास नकार देत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close