क्राईम

निर्वस्त्र तरुणांने केलेल्या मारहाणीत वृद्ध इसमाचा मृत्यू

केज — तालुक्यात असलेल्या कुंबेफळ येथील बाबुराव जाडकर या वृद्धास निर्वस्त्र असलेल्या तरुणाने मारहाण केली यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील कुंबेफळ येथील रहिवाशी बाबुराव जाडकर वय 85 वर्ष हे कुंबेफळ — सारणी (आ ) रोडवर खडी क्रेशर च्या जवळ असलेल्या शेताच्या कडेला बसलेली होते. यावेळी तिथे अचानक एक निर्वस्त्र तरुण आला . बाबुराव जाडकर यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोरास पकडले. मात्र निर्वस्त्र तरुण कुठला आहे मारहाण का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close