क्राईम

आष्टी तहसील चा अव्वल कारकून पाच हजाराची लाच घेताना जेरबंद

आष्टी — स्वस्त धान्य दुकानाचा परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अव्वल कारकून अजिनाथ मधुकर बांदल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले.
स्वस्त धान्य दुकानदास परवाना नुतनीकरण करण्यासाठी आजिनाथ बांदल वय 41 वर्ष या अव्वल कारकुनाने पैशाची मागणी केली. मात्र यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या आवारातच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बांदल यास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अव्वल कारकून या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अमोल बागलाने, सखाराम घोलम, विजय बरखडे, संतोष मोरे यांनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close