आपला जिल्हा

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड — बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता प्रकरण चांगलंच अंगलट आलं आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कारवाई होत असल्यामुळे बीडचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केलंय. दुसरीकडे या सर्व कारवाईनंतर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी सदर कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप केलाय. तसेच आपण याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचंही सांगितलं. आम्ही विकास काम करत आहोत. बीड शहरातील विकास काम विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे असा खोडसाळपणा करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काका क्षीरसागर यांनी केलाय.

तक्रारदारावर अब्रुनुकसानीचा दावा करणार
चुकीचे कागदोपत्री दाखवून दिशाभूल करण्यात आलीय, त्यामुळे माझी आणि बीडच्या जनतेची बदनामी झाली आहे. म्हणून तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. असं मत नगराध्यक्ष भरातभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय.

काय  आहे प्रकरण-

बीड नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांवर गुणवत्ता आणि दर्जेदार कामे व्हावीत, म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आपले कर्तव्य होते. परंतु विरोधकांनी याबाबत कामात खोडा घालण्याच्या उद्देशाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले अभियंत्यांना नियुक्त करण्याची मागणी करणे गैर नाही. मात्र या प्रकरणात केवळ आपली बदनामी करण्यासाठी राजकीय हेतूने आणि जनतेत आपल्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे हेतूने कारवाई सुरू करण्यात आली. मात्र याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही केली नाही किंवा तसे न्यायालयाचे निर्देशही नाहीत. असे असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीडमधून जाता जाता अपात्रतेचे निर्देश देण्याच्या कागदावर कोणत्या उद्देशाने सही केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close