क्राईम

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

बीड — तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात सिंदफणा नदीपात्रामध्ये पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या कारवाईत बरोबरच वाहनांचे चालक व मालकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांना मोठा दणका बसला आहे.

याबाबत अधिक अशी की, तांदुळवाडी शिवारात सिंदफणा नदीपात्रामध्ये सोमवारी दुपारी वाळू माफियांकडून पाच ट्रॅक्टर, एक टेम्पो द्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खबर पोलीस अधीक्षकांचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली. खबरीनुसार त्यांनी सिंदफणा नदी पात्रात छापा टाकून वाहन चालकांना पहिल्यांदा ताब्यात घेतले व त्यानंतर वाहन मालकांना बोलावून ताब्यात घेतले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर एक टेम्पो यासह 33 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण बारा आरोपींचा समावेश आहे पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी सांगितले.

गेवराई तालुका अवैध वाळू उपशात आघाडीवर-

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील गोदा पात्रा मध्ये सर्वाधिक वाळू उपसा केला जातो. वाढत्या वाळू उपशामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. गेवराई तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्याचे मोठे आव्हान बीड पोलिसांच्या समोर आहे. याबरोबरच पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सिंदफणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे या वाळू उपशाला देखील आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील आठवडाभरात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने वाळू माफिया विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. परिणामी वाळू माफियांना मोठा दणका बसला आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सापडलेले आरोपी खालील प्रमाणे आहेत. यामध्ये
जुबेर सत्तार शेख (चालक रा.हुसेनिया कॉलनी , तेलगाव नाका, बीड), अशोक राधाकिसन पौळ (चालक रा.तांदळवाडी हवेली ता.जि.,बीड), सखाराम तुकाराम खोड (चालक रा.पारगावशिरस ता.जि.बीड), राजु नामदेव सांगे (रा.तांदळवाडी हवेली ता.जि.बीड,) राहुल उदव निर्मल (चालक रा.तांदळवाडीहवेली ता.जि.बीड), पांडुरंग भानुदास कोळेकर, (चालक रा.तांदळवाडीहवेली .जि.बीड) अशी आरोपींची नावे आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close