महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ करू नये-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

विजय चौधरी यांची महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेच्या अध्यक्षपदी निवड

शिर्डी —मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलीये.अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी क्षीरसागर बोलत होते.

अहमदनगर जिल्हा प्रांतिक तैलीक समाज सभेच्या वतीने श्रीक्षेत्र शिर्डी येथे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज सभेचा भव्य समाज मेळावा आणि विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले यावेळी या मेळाव्यासाठी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे,नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर माजीआमदार शिवाजी चोथे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे जी एम जाधव,साई शेलार,मनोज संताशे,राजेश लूटे, बद्रीसेठ लोखंडे, विजय काळे,प्रियाताई महिंद्रे, शारदाताई लूटे, डॉ अरुण भस्मे,शिरीष चौधरी राजेन्द्र पवार,प्रा राजू मचाले,यांची देखील उपस्थिती होती.

आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही असताना राज्यभरात विविध आंदोलन सुरू आहेत.तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी देखील जोर धरू लागलीये. यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये.ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचं क्षीरसागर यांनी म्हंटलंय.

ओबीसीसाठी असलेल्या केंद्राच्या 27% आरक्षणाचे वर्गीकरण होऊन
अती मागास वर्गात तेली समाजाला समाविष्ठ करावे… सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच संख्येच्या प्रमाणात तेली समाजाला राजकीय आरक्षण मिळावे अशा मागण्या यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी या मेळाव्या प्रसंगी केल्या आहेत.
व महाराष्ट्र प्रांतिक तेली सभेच्या अध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड केल्याचे जाहीर केले,नवनियुक्त अध्यक्ष विजय चौधरी यांनी यावेळी त्यांची कार्यकारिणी जाहीर केली कार्यकारी अध्यक्ष म्हणून माजी खासदार सुरेश वाघमारे व विक्रांत चांदवडकर तर ज्ञानेश्वर दुर्गुळे यांची सरचिटणीस निवड जाहीर केली तर संध्या सव्वालाखे यांची प्रांतिक सभेच्या महिला अध्यक्षा म्हणून निवड जाहीर केली तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून जी एम जाधव,तर विजय संकपाळ यांची राज्य युवक अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली यावेळी महाराष्ट्रातून 2000 पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते,अहमदनगर तेली समाजाच्या वतीने ही राज्यस्तरिय बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी प्रतिभा चौधरी,डॉ सुहास व्यवहारे, डॉ वृषाली व्यवहारे,डॉ केदार,रुपेश चौधरी,सुखदेव वंजारी,ऍड खोब्रागडे,कृष्णराव हिंगणकर,सखाराम मिसाळ, लक्ष्मण राऊत,मनोहर शिनगारे,रावसाहेब राऊत,रायमूल रवी कोरे,बनसोडे यांच्यासह राज्यातून मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close