ब्रेकिंग

सुसाईड नोट व व्हिडिओ व्हायरल करून कोळगावचे महाराज गायब

गेवराई — तालुक्यात असलेल्या कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थान चे मठाधिपती हनुमान महाराज यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान महाराजांनी रविवार दि.7 फेब्रुवारी रोजी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला

 त्यानंतर महाराज गायब झाल्याने एकच खळबळ उडाली. चकलांबा पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

हनुमान महाराज यांनी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार 31 जानेवारी रोजी दाखल करण्यात आली होती. विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा महाराजांवर दाखल करण्यात आला होता.मात्र रविवारी या प्रकरणी वेगळेच वळण मिळाले.हनूमान महाराज यांनी बदनाम करण्यासाठी माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात असून माझ्याकडे पैशाची देखील मागणी आरोप करणाऱ्यांनी केली होती. त्यामुळे माझा दोष नसताना नाहक आरोप करून मला अडकवण्याचे षड्यंत्र रचले गेल्याचं म्हणत माझी जगण्याची इच्छा नसल्यामुळे मी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट त्यांनी लिहिली याबरोबरच त्यांनी यानुषंगाने एक व्हिडिओ व्हायरल केला. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या लोकांची नावे देखील त्यांनी दिली आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली की त्यांनी केली आहे. महाराजांचा हा व्हिडीओ व सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत महाराजांचा शोध लागला नाही. चकलांबा पोलिस या प्रकरणी तपास करत असून महाराजांनी चौसाळा परिसरात आत्महत्या केल्याची अफवा पसरली त्यामुळे चौसाळा पोलिसांनी सतर्क होते. संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close