महाराष्ट्र

परळी- पानगाव रस्त्याचं काम करणारी कंपनी थोरल्या साहेबांच्या गावची दर्जाबाबत पालकमंत्री मुंडे साशंक ?

घाटनांदूर-पानगाव ८५ कोटी रुपयांच्या 32 किमीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनन

अंबाजोगाई — मतदार संघाचा विकास करताना निधी बास असं म्हणण्याची वेळ या भागातील लोकांवर येईल असं काम करून दाखवेल असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घाटनांदुर पानगाव या 85 कोटी रुपयांच्या 32 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना दिला. असं असलं तरी सदर रस्त्याचे काम डीपीजे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे असून,हि कम्पनी कामाचा दर्जा कसा राखील याबाबत मात्र पालकमंत्र्यांनी शंका व्यक्त करत कामाचा दर्जा राखण्याचे निर्देश दिले. ही कंपनी थोरल्या साहेबांच्या बारामतीची असल्याने काम किती गतीने होईल याबाबत देखील जनतेतून तर्कवितर्क लावले जात आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या 32 किमी मार्गे परळी – चांदापुर – अंबलटेक – घाटनांदूर – पिंप्री – फावडेवाडी या 36.100 किमी. लांबीच्या 85 कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे भूमिपूजन शनिवारी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.मागील 25 वर्षांच्या राजकीय प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी संघर्ष सहन केला, 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर संघर्ष आणि षडयंत्र यांचा मला सामना करावा लागला, परंतु माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्यातील एक सदस्य वाटतो, हे प्रेम आणि हा विश्वास मी कमावला ते इथल्या जनतेच्या बळावरच! इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच माझे उद्दिष्ट असून, रस्ते, नाल्या, वीज या मूलभूत सुविधा देणे हा विकास म्हणता येणार नाही, तो तर कर्तव्याचा भाग आहे. या भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, इथला शेतकरी सधन व्हावा हे माझं या मतदारसंघासाठी पाहिलेलं स्वप्न आहे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.
एकीकडे धनंजय मुंडे मतदार संघाच्या विकासाबाबत तळमळ दाखवत असताना दुसरीकडे या भागात होत असलेली विकास काम बारामतीकरांच्या पदरात पडत असल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहेत. बारामतीची डीपीजे कन्स्ट्रक्शन कंपनीकडे परळी पानगाव रस्त्याचे काम असल्यामुळे विहित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करावे असे निर्देश देण्याची वेळ धनंजय मुंडे यांच्यावर आली. मांजरसुंबा अंबाजोगाई रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. दर्जा बाजूलाच राहिला जागोजाग रस्ते खांदून ठेवल्यामुळे दोन-तीन वर्षापासून या भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले,आरोग्यावर व शेतीच्या उत्पन्नावर देखील उठणाऱ्या धुळीच्या लोटांनी परिणाम केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सरकारच्या व आताच्या सरकार मध्ये देखील या भागाची स्थिती अजून बदलली नाही. खुद्द पालकमंत्र्यांनीच डी पी जे कंपनी बाबत शंका व्यक्त केल्यामुळे लोकांमधून देखील कंपनीबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत.
परळी पानगाव रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आ. संजय दौंड, सौ. शिवकन्याताई सिरसाट, अशोकराव डक, बजरंग बप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, राजेश्वर आबा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, सा.बा. विभागाचे अभियंता श्री. पाटील यांनी या कामाची माहिती उपस्थितांना दिली तर गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्र संचलन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close