राजकीय

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

मुंबई — विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली होती त्यामुळे तेच प्रदेशाध्यक्ष होतील असा अंदाज वर्तविला जात होता.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता
विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधिमंडळ गटनेते पद तसेच मंत्रीपद असल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाला तरी द्यावी अशी मागणी पक्षातून होत होती
यासंदर्भात थोरात, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील तसेच अन्य नेत्यांची दिल्लीत बैठक झाली होती, मात्र योग्य उमेदवाराचे नाव अंतिम होत नसल्याने थोरातच कायम राहतील, अशीही चर्चा होती.

नाना पटोले यांचे नाव पहिल्यापासून प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. पटोले यांच्या दिल्लीवारीनंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ज्यामुळे तेच प्रदेशाध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. या स्पर्धेत आतापर्यंत विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या मंत्र्यांची नावे चर्चेत होती.काँग्रेसने 6 कार्याध्यक्षही नेमले असून या पदावर शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांना नेमण्यात आले आहे. तर 10 प्रदेश उपाध्यक्ष नेमण्यात आले असून त्यामध्ये हुसेन दलवाई, रमेश बागवे, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलाश गोरंट्याल, माणिक जगताप यांचा समावेश आहे. नाना पटोले व त्यांना मिळालेले नवे तगडे सहकारी यामुळे काँग्रेसला चांगले दिवस येतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close