देश विदेश

शेतकरी आंदोलन: तीन राज्य सोडता देशभर होणार चक्काजाम

नवी दिल्ली — कृषी कायद्याविरोधात अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान शेतकरी संघटनांनी सहा फेब्रुवारी रोजी देशभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र या आंदोलनातून तीन राज्य वगळण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे
शनिवारी होणाऱ्या या चक्का जाममध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनही तयारी करत आहे. याबाबत बोलताना संयुक्त किसान मोर्च्याचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, ‘जे लोक येथे येऊ शकले नाहीत, ते शनिवारी आपापल्या ठिकाणी राहून शांतपणे चक्का जाम करतील.’

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनुसार राकेश टिकैत म्हणाले की, 6 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात चक्का जाम होणार नाही. हे दोन राज्य आणि दिल्लीत चक्का जाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शेतकरी नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची घोषणा केली आहे. यावर दिल्ली पोलिस अधिकारी म्हणाले आहेत की, चक्का जामबाबत आम्ही कोणत्याही शेतकरी नेत्यांशी संपर्क साधला नाही. मात्र दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिस याबाबत गंभीर आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलन अधिक बळकट व्हावे म्हणून शुक्रवारपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक शेतकरी पंचायतींचे आयोजन करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close