महाराष्ट्र

खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यातही सापडले तोफगोळे

खर्डा — जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या भुईकोट किल्ल्यांमध्ये महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामादरम्यान केलेल्या उत्खननात तोफगोळे सापडले आहेत. पन्हाळगडा जवळ असलेल्या पावनगडावर देखील नुकतेच तोफगोळे सापडले होते.

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या खर्डा येथील भुईकोट किल्ल्याची सध्या दुरुस्ती व सुशोभीकरण पुरातत्व विभागा च्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी उत्खनन करत असताना जवळपास 311 तोफगोळे सापडले आहेत.1795 साली मराठा आणि निजाम यांच्यात लढाई झाली होती. या लढाईच्या वेळी या तोफगोळ्यांचा उपयोग झाला असण्याची शक्यता इतिहास तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मराठा व निजाम यांच्यात झालेल्या लढाईचे ऐतिहासिक पुरावे आजही किल्ला परिसरात आढळून येतात. तोफगोळे सापडल्यानंतर या ठिकाणी इतिहासप्रेमींनी एकच गर्दी या ठिकाणी केली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close