देश विदेश

शेतकरी आंदोलन:सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही संकटात — मीना हॅरिस

पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनावर फिट केल्यानंतर या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे.अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाच्या समर्थनार्थ आता बोलू लागले आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या भाचीनंही ट्विट करून शेतकऱ्यांविरुद्ध होत असलेल्या कारवाईवर ट्विट केलं आहे. मीना हॅरिस हिने सर्वांना याविरुद्ध आवाज उठवण्याचं आवानही केलं आहे.
सध्या केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यावरून शेतकरी विरूद्ध केंद्र सरकार असं चित्र निर्माण झाला आहे. आंदोलनाची धार वाढल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांची कोंडी करत अन्न,पाणी, शौचालयाची सुविधा मिळू नये यासाठीसंपूर्ण नाकेबंदी केली आहे याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू लागले आहेत. पॉप स्टार रेहाना हिने ट्विट करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ने देखील शेतकरी आंदोलनात उडी घेतली. याबरोबरच कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरिस हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही संकटात — मीना हॅरिस

जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एका महिन्यापूर्वी हल्ला झाला. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही संकटात आहे. हा निव्वळ योगायोग नाही. हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. भारतात शेतकरी आंदोलकांविरुद्ध पोलिसांचा वापर आणि इंटरनेटवर बंदीविरुद्ध आपल्या सर्वांनी आवाज उठवायला हवा,” असं ट्विट मीना हॅरिस यांनी केलं आहे. मीना हॅरिस हिने पॉपस्टार रिहानाने केलेलं ट्विटही रिट्विट केलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close