क्राईम

भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बसने वृद्धेस चिरडले

केज — बीड कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बस ने एका वृद्ध महिलेस चिरडल्या ची घटना केज अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालय समोर दुपारी घडली. यात वृद्ध महिलेच्या डोक्याची कवटी फुटल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास अंबाजोगाईहून बीड कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बस क्रमांक एम एच -09 — एफ एल 1042 ने उपजिल्हा रुग्णालय समोर येताच रस्त्याच्या कडेने जात असलेल्या काशीबाई रामभाऊ थोरात या 65 वर्षीय महिलेस जोराची धडक दिली. या दुर्घटनेत काशीबाई या बसच्या टायर खाली आल्यामुळे त्यांच्या डोक्याची कवटी फुटली या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close