आपला जिल्हा

माहिती न देणाऱ्या बीडच्या मूख्याधिकार्‍यास डीपीडीसीच्या बैठकीतून पालकमंत्री धनंजय मुंडेंनी हाकलून दिले

निलंबनाची कारवाई प्रस्‍तावित करण्‍याचे निर्देश

बीड – जिल्हा नियोजन समितीला कसलीच माहिती न देता कामचुकारपणाचा प्रत्यय बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी दिला. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून हाकलून दिले. याबरोबरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने यंत्रणेला दिले आहेत.
बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीची आज बैठक सुरू आहे. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. बैठकीपूर्वी सर्वच विभागाकडून विकास कामासंदर्भात माहिती मागवून घेण्यात आली होती. मात्र मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी नगरपालिकेतील विविध विकासकामं, योजनांची माहिती दिली नाही. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले. संतापलेल्या मुंडे यांनी मुख्याधिकारी गुट्टे यांना सभागृहाबाहेर अक्षरश: हाकलून दिले.याबरोबरच गुट्टे यांच्याविरोधात कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना देखील पालकमंत्री मुंडे यांनी दिल्या. या बैठकीला सामाजिक न्याय व विशेष सहाय तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर ,आ. प्रकाश सोंळके, आ. बाळासाहेब आजबे, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, आ. संजय धौड, जि. प अध्यक्षा सौ. सिरसाट आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close