महाराष्ट्र

अमृता फडणवीस होत आहेत ट्रोल; म्हणे शंभर वर्षात असा झाला नाही असा अर्थसंकल्प

नागपूर — मा.मू. अर्थात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाज माध्यमांमध्ये ट्रोल होताना दिसून येतात. यावेळी देखील केंद्रीय अर्थसंकल्पाच तोंड भरून कौतुक करताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांनी शंभर वर्षात असा अर्थसंकल्प मांडला गेला नाही असं म्हटलं आहे. स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली आहेत मग त्यापुर्वी देखील अर्थसंकल्प सादर होत होता काय की काय असा सवाल विचारत त्यांची खिल्ली उडवली जात आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. देशात याबाबत प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या.अमृता फडणवीसांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली. पण सरकारचं कौतुक करताना त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांना वर्षांचंसुद्धा भान राहिलं नाही असंच म्हणावं लागेल

Thank you FM Smt @nsitharaman for presenting budget in a manner never seen in a 100 years in India.
All countries in the world will now observe and learn the art of giving impetus to growth without levying additional tax. #Budget2021 #UnionBudget2021 #NirmalaSitaraman

देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षं झालीत तर 1947 रोजी देशात पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला मात्र असा अर्थसंकल्प गेल्या 100 वर्षांत बघितला नाही असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलंय. त्यामुळे स्वांतत्र्यच्या आधीही अर्थसंकल्प सादर होत होता असं अमृता फडणवीसांना वाटतंय की काय असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर अनेकजण त्यांना या मुद्द्यावरून ट्रोल करत आहे. अनेकांनी तर त्यांना ही बाबही लक्षात आणून दिली आहे. स्वातंत्र्याला १५० वर्षं झालीत का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात येतोय

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोव्हेंबर १९४७ रोजी देशात पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शानुखम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात तब्बल ४६ टक्के निधी हा सुरक्षा क्षेत्राला देण्यात आला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close