क्राईम

पावणेचार लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड — शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मिततसेच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विदेशी दारू च्या सुमारे पावणेचार लाख रुपयाच्या पन्नास पेट्यांचा साठा बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री पकडला.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कांतीलाल उमाप व पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड नितिन धार्मिक यांचे नेतृत्वाखाली बीड व अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावातील रामराव कृष्णाजी जायभाये याच्या घरात रात्री 12.30 वाजता धाड टाकली असता त्याचे घरातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गोवा राज्याच्या बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आल्याने रामराव कृष्णाजी जायभाये या इसमास अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गोवा राज्याची दारु चोरी छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याने आरोपीचा मुलगा बाळासाहेब रामराव जायभाये याचेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून धाड पडल्याची माहिती मिळताच तो पसार झाल्याने त्याला फरार घोषित करुन त्याचा शोध सुरु आहे. तसेच यामागे असलेल्या सूत्रधाराचाही शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे.
सदर धाडीत गोवा राज्यातील बनावटीच्या विदेशी मद्याच्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 1776 सीलबंद बाटल्या, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 240 सीलबंद बाटल्या, ब्लॅक डीएसपी विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 288 सीलबंद बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या व ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या, अशी 3 लाख 64 हजार 800 रुपयांची दारु, 1 मोटरसायकल क्रमांक MH 23 AZ 0842 किंमत रु. 40 हजार, 1 मोबाईल किंमत रु. 5 हजार व बाटल्यांवर लावण्यासाठी बनावट लेबल 3000 नग किंमत रु. 6 हजार असा एकूण 4 लाख 15 हजार 800 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री डि.एल.दिंडकर, जवान सांगुळे, वाहनचालक शेळके व अहमदनगर जिल्ह्यातील निरिक्षक श्री बनकर, निरिक्षक श्री घोरतळे, दुय्यम निरिक्षक श्री बडदे, श्री सूर्यवंशी, श्री धोका, श्री ठोकळ, श्री बारावकर व त्यांचेसोबत जवान ठुबे, वामने, बिटके, कांबळे, बटुळे व महिला जवान श्रीमती आठरे यांनी सहभाग नोंदविला.
…..तर माहिती द्या
नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close