आपला जिल्हा

मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार दोन जखमी

माजलगाव — पाथरीहून माजलगाव कडे येत असताना दुगड पेट्रोल पंपाजवळ बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की या दुर्घटनेत दोन्ही मोटर सायकलस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथरी येथून माजलगाव कडे येत असलेल्या बसच्या पाठीमागे वडवणी तालुक्यातील देवगाव येथील 25 वर्षीय युवक अतुल आनंद सूरवसे हा एकटाच मोटार सायकल ने येत होता . राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दुगड पेट्रोल पंपाजवळ समोरून चालणाऱ्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळी समोरून गणेश गुलाब झेटे वय 22 वर्ष रा. घळाटवाडी हा मोटार सायकल ने आणखी दोन जणांना घेऊन येत होता. या दोन्ही मोटरसायकलची समोरा समोर जोराची धडक झाली. या अपघातात अतुल सुरवसे व गणेश झेटे
दोन्ही मोटरसायकल चालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गणेश झेटे याच्या मोटरसायकलवर येणारे पांडुरंग विष्णू शिंदे हे वय 22 वर्ष तसेच कविता सूर्यकांत नरवडे हे गंभीर रित्या जखमी झाले त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close