ब्रेकिंग

लातूर : गंजगोलाई तील चार मजली गोदामाला आग लाखोंचे नुकसान

लातूर — शहरातील गंजगोलाईतील शिवाजी रोड वर असलेल्या चार मजली गोदामाला शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निकांडात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यात जीवित हानी झाली नाही.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गंजगोलाई परिसरात कमलकिशोर अग्रवाल यांचे चार मजली गोयल ट्रेडर्स नावाचे ऑईलपेंटचे गोडाऊन आहे. याच गोडाऊन परिसरात शहराची मुख्य बाजारपेठ आहे. अचानक दुपारी या इमारतीच्या चौथ्या मजल्यात आग लागली. आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले.

तोपर्यंत चौथ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. त्यांनी पाच बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दरम्यान, गंजगोलाईमधील सराफ लाईन, मिरची लाईन परिसर पोलिसांनी सील करून वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले आहे. या दुर्घटनेत किती चे नुकसान झाले याचे आकडे अद्याप समोर आले नाहीत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close