आपला जिल्हा

सरपंच पदाची आरक्षण सोडत 4 व 5 फेब्रुवारीला

बीड — प्रशासनाने जाहीर केलेले सरपंच पदाचे आरक्षण शासनाने रद्द केले होते. पुन्हा आता नव्याने 4 व 5 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील 1031 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दुपारी एक वाजता तहसील कार्यालयामध्ये‌ पार पडणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आर एस जगताप यांनी आरक्षण सोडतीसाठी सर्व तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
डिसेंबर मध्ये सुरुवातीलाच सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले होते मात्र हे आरक्षण नंतर ग्रामविकास विभागाने रद्द केले.नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका चा पहिला टप्पा पार पडला असून आता सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे
जिल्ह्यातील 1 हजार 31 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा नव्याने सोडण्यात येणार आहे. दि.4 फेब्रूवारी रोजी बीड, गेवराई, शिरुर, पाटोदा, आष्टी, माजलगाव, वडवणी, धारुर, अंबाजोगाई व केज या तालुक्यातील आरक्षण सोडत तर दि.5 फेबु्वारी रोजी परळी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. तहसिलदार यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जगताप यांनी 11 तालुक्यांच्या तहसिलदारांना आदेशित केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close