कृषीवार्ता

कृषी क्षेत्रातील विकासासोबतच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचे थाटामाटात उद्घाटन

बीड — अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) अंतर्गत कृषी शास्त्र विभाग आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2021 चे सौ एस के (काकू) कृषी महाविद्यालय फार्म, काटवट वाडी शिवार येथे आदरणीय गुरुपुत्र कृषिरत्न आबासाहेब मोरे व श्री जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन झाले.

हा कृषी महोत्सव दोन दिवस (दि. २६ आणि २७ जाने. २०२१) चालू असणार असून हजारो शेतकऱ्यांनी आतापर्यंत महोत्सवास भेट दिली आहे. यावेळी मा. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर यांनी मत व्यक्त करताना बीड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारसा सांगत काळानुसार बदलत असलेली शेती सुधारणा कशी करावी याबद्दल माहिती दिली. कृषी क्षेत्रातील विकासासोबतच प्रक्रिया उद्योगावर भर देऊन शेतकऱ्यांनी सक्षम होण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले.

आबासाहेब मोरे यांनी निसर्गाची जाणीव ठेवून विज्ञानाची सांगड घालत शेती करणे काळाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगती साधतानानवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर न देता पारंपारिक गावरान बि_बियाणे वापरून पोषणयुक्त व विषमुक्त अन्न पिकवावे व ते खाण्यावर भर द्यावा असे सांगितले. सेंद्रिय शेतीकडे वळावे. उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे प्रतिपादन केले.

यावेळी ऍड. अजयजी राख, सरकारी वकील, डी. जी.मुळे, प्रकल्प संचालक आत्मा, बीड, दिलीप गोरे, प्रगतशील शेतकरी तथा माजी नगराध्यक्ष, श्री अनंत कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंके, अमोल मुंडे, वन अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, सेवेकरी, विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close