क्राईम

प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले

साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड — गेल्या काही दिवसापासून बस मधून प्रवास करणाऱ्या महिला वर पाळत ठेवून त्यांचे दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखे वर सोपवली. या गुन्ह्यातील दोन महिलांना जेरबंद करत त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरीला जात असलेल्या घटनांमध्ये वाढ झाली. याची दखल घेत पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे वर सोपवली. या चोरीच्या घटनातील आरोपींचा बीड शहरात शोध घेतला जात असताना 25 जानेवारी रोजी दागिने चोरणाऱ्या सोनी चव्हाण व रोहिणी चव्हाण या दोन महिला चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी गेवराईहून बीडला वेरना कार क्र. 12 जे यू.4500 ने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना रोडवरील संगम हॉटेल समोर सापळा रचला. गेवराई कडून ही गाडी दुपारी साडेतीन वाजता येत असल्याचे पाहताच पोलिसांनी गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच चालकांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पळ काढला. मात्र गाडीत असलेल्या सोनी उर्फ जावेद चव्हाण रा. नागझरी ता.गेवराई, तसेच रोहिणी शहादेव चव्हाण रा बांगर नाला बालेपीर बीड या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही महिलांची पंचा समक्ष महिला पोलिसांनी अंगझडती घेतली असता सोन्याच्या मण्याचे गंठण, सोन्याच्या पट्टीचे गंठण व सोन्याचे मणी मंगळसूत्र आसा 1लाख 65 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता आठ-नऊ दिवसापूर्वी नेकनुर बस स्थानकात बस मध्ये मांजरसूंबा ते बीड बस प्रवासात तसेच पंधरा दिवसापूर्वी धारूर बसस्थानकामध्ये हे दागिने चोरल्याची कबुली ही त्यांनी दिली. याबरोबरच धारूर ते माजलगाव बस प्रवासात पंधरा दिवसापूर्वी. माजलगाव तेलगाव प्रवासात पाच सहा दिवसापूर्वी दागिने चोरल्याची कबुली देखील त्यांनी दिली.सदर वेरना कार आम्ही चोरी करण्यास जाण्या येण्यासाठी वापरत असुन ती पप्पु उर्फ जावेद विश्वास चव्हाण , रा . नागझरी याची असुन तो कार सोडून पळुन गेल्याचे त्यांनी सांगितले. या महिला चोरांनी दिलेल्या माहितीवरून सदर पोलीस स्टेशनचा अभिलेख तपासला असता त्या कालावधीत पोस्टे नेकनुर गुरनं 12/2021 , कलम 379 भादवि , पोस्ट पेठ बीड गुरनं 11/2021 , कलम 379 भादवि , पोस्टे धारुर गुरनं 08/2021 , पोस्टे माजलगाव शहर गुरनं 14/2021 , कलम 379 भादवि , गुरनं 23/2021 , कलम 379 भादवि असे 05 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आली . या दोन महीला आरोपींकडुन पोस्टे नेकनुर , पोस्टे पेठ बीड , पोस्टे धारुर गुन्ह्यातील चोरी गेलेले दागिने किंमत 1लाख 65 हजार रुपये चा मूद्दे माल व गुन्ह्यात वापरलेली वेरना कार किंमती 6 लाख रुपये असा एकुण 7,लाख65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सदर मुद्देमालासह दोन्ही महीला आरोपींना पोस्टे नेकनुर गुरनं 12/2021 , कलम 379 भादवि मध्ये हजर केले आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे नेकनुर येथील पालीस उप निरीक्षक काळे हे करत आहेत . पोस्टे माजलगाव शहर गुरनं 14/2021 व 23/2021 , कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेला मुद्देमाल व या महीला आरोपींच्या इतर साथिदारांचा शोध पोलीस घेत आहेत. या महीला आरोपींकडुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .हि कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि कांगूणे, स.पो.नि. बी.डी. नवले, उबाळे तांदळे, क्षीरसागर, बांगर ,ठोंबरे गायकवाड ,नरवडे ,जाधवर, हराळे, वंजारे यांनी पार पाडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close