ब्रेकिंग

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका वैमानिकाचा मृत्यू

नवी दिल्ली — जम्मू काश्मीर आणि पंजाबच्या सीमारेषेवर भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. कठुआ जिल्ह्यातील लखनपूर येथे ही दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका वैमानिकाची प्रकृती गंभीर असून दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

HAL Dhruv हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेले असून यामागे तांत्रिक कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे हेलिकॉप्टर पठाणकोट येथून येत होते. कठुआचे एसएसपी शैलैंद्र मिश्रा यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरला जिल्ह्यातील लखनपूर परिसरात लष्कराच्या जागेवर क्रॅश लँडिंग करावे लागले.
दुर्घटनेत भारतीय लष्कराचे विमान दुर्घटनाग्रस्त दोन वैमानिक जखमी झाले होते, त्यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे. एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close