ब्रेकिंग

💐🌹बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा; पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांना शौर्यपदक जाहीर💐🌹

बीड — गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना राजा रामा स्वामी यांनी नक्षलवाद्यांविरोधात जीवाची पर्वा न करता केलेल्या धडक कारवाईत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करत आपल्या साहसाचा परिचय करून दिला. त्यांच्या या शौर्याची दखल घेत शासनाने त्यांना शौर्यपदक जाहीर केले आहे.

पोलीस दलात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त विविध पदकांनी गौरविण्यात येते. शौर्य पदकासाठी पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांची निवड झाल्याने बीड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गडचिरोली येथील सिरोंचामध्ये 2018 मध्ये नक्षलवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राजा रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली 15 कर्मचाऱ्यांची दोन पथके कारवाईसाठी गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात तीन पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देतांनाच नेतृत्वगुणांचा परिचय राजा रामा स्वामी यांनी दिला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवाद्यांचा जागीच खात्मा झाला. त्यांच्या या शौर्य व नेतृत्व गुणाबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे.

SHARE

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close