आपला जिल्हा

चौसाळा पिंपळगाव रस्त्याची झाली चाळणी आंदोलनाचा इशारा

      • चौसाळा जि.प.सदस्याचा कारभार खोट बोल पण रेटुन बोल –विवेक कुचेकर 

बीड —  तालुक्यातील चौसाळा जि,प, सर्कलमध्ये येत असलेल्या चौसाळा ते पिपंळगाव रस्त्यांची मोठया प्रमाणावर चाळणी झाली असुन या रस्त्यवर रहदारी करणा-यांना खडतर प्रवास करावा लागत असुन या रस्त्यवरील खड्डी उघडी पडली असल्यामुळे दुचाकीचे अनेक अपघात याठिकाणी घडले असुन अनेकांना दुखापती झाल्या आहेत


चौसाळा ते पिपंळगाव रस्ता हा १० किलोमिटर असुन संपुर्ण रस्तयाची चाळणी झाली आहे गेल्या पाच वर्षापासुन हा रस्ता खड्डेमय झाल्यान पाच गावातील नागरिकांना धुळीतुन प्रवास करावा लागत आहे तर रहदारी करणारया वाहनधारकांचे मोठे नुकसान होत असुन मान,पाठ,कंबरेचा मोठा त्रास उद्भवत आहे तर याच परिसरात भिमाशंकर कारखाना असुन यामुळे अनेक ऊसतोड मजुर हे बैलगाडीतुन ऊस वाहतुक करतात मात्र खराब रस्तयामुळे ऊसतोड कामगारासह बैलानाही नाहक त्रास होताना दिसत आहे तर अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत गेल्या लोकसभा विधानसभेच्या काळात शोसल मिडियाद्वारे बातम्या पेरल्या जात होत्या की तत्कालीन शिवसंग्राम व आता भाजपाचे जिल्हापरिषद सदस्य असलेल्या आशोक लोढानी रस्तयाचे काम मंजुर केले आहे व रस्तयाच्या मोजणीचे काम चालु आहे मग मंजुर केलेला रस्ता गेला कुठे ? चौसाळा जिल्हापरिषद सदस्याचा कारभार खोट बोल पण रेटुन बोल असा असुन आगामी काळात चौसाळा जिल्हापरिषद सर्कल मधील जनता नक्कीच धड्डा शिकवेल पाच गावाना जोडणारा हा मुख्य रस्ता तात्काळ करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका संघटक विवेक कुचेकर यांनी दिला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close