क्राईम

मुलीच कशा होतात म्हणून डॉक्टरने पत्नीस जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

बीड — मुलगा होत नाही तुला मुलीच कशा होतात असं म्हणत मलेरिया डॉक्टर कडून पत्नीचा अमानुष छळ होत होता मात्र डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलत पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला या घटनेने सारोळा परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
केज तालुक्यातील सारोळा येथील प्रियंका ढाकणेचा कळंब येथील येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपल्या पत्नीसह दोन मुलींना बरोबर घेऊन विशाल उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे राहत होता. विशाल हा मलेरिया डॉक्टर आहे. लग्नानंतर पहिली मुलगी झाली व दुसरीही मुलगीच झाली. त्यानंतर प्रियंका हिचा नवऱ्याकडून व त्याच्या कुटुंबीयांकडून छळ होऊ लागला. अक्षरशः प्रियंकाला वेळेवर जेवण देखील दिले जात नव्हते. शुक्रवारी रात्री य प्रियंकाला तिच्या पतीने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिच्या चार महिन्याच्या मुलीला देखील अमानुष मारले असल्याचा प्रियंकाचा आरोप आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पतीकडून जाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काडीपेटी भिजल्या मुळे दुसरी शोधेपर्यंत घरातून पळ काढत प्रियंकाने कळंब चे बस स्टँड गाठले व थेट बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सारोळा येथे माहेरी पळून आली. पळून आल्यामुळेच माझा जीव वाचला अशी धक्कादायक आपबिती..पीडित प्रियांका घुगे या पीडितेने सांगितली. तिच्या वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून माझ्या चार महिनीच्या मुलीला वाचवा असा आक्रोश पीडिता करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close