देश विदेश

‘हि’मुलगी बनणार एक दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री

नवी दिल्ली — ‘ नायक ‘ हा अनिल कपूरची भूमिका असलेला हिंदी चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगलाच गाजला होता आदर्श मुख्यमंत्री कसा असावा हे या चित्रपटात दाखवले होते. एका वृत्तवाहिनीसाठी मुलाखत घेताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्‍हानावरुन एक दिवसासाठी अनिल कपूर मुख्यमंत्री झाला. त्यानंतर तो कायमस्वरूपी मुख्यमंत्री झाला. अशी या चित्रपटाच कथानक होतं. याच चित्रपटातील कहानी सत्यात उतरतांना दिसून येत आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एका दिवसासाठी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.
सृष्टी गोस्वामी अस या महाविद्यालयीन विद्यार्थिनी नाव आहे. तिला एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनण्याचा मान दिला जाणार आहे.
हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरची रहिवासी असलेली सृष्टी गोस्वामी 24 जानेवारी रोजी एक दिवसाची मुख्यमंत्री होणार आहे. येत्या 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे. यानिमित्ताने मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी सृष्टी गोस्वामींची निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी याला मंजुरी दिली आहे. यात आणखी विशेष म्हणजे ती सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेला संबोधितही करणार आहे.
दरम्यान सुरुवातीला सृष्टी राज्यातील विकासकामांची समीक्षा करेल. त्यानंतर 12 विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांचे पाच-पाच मिनिटांसाठी सादरीकरण करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजपर्यंत विधानसभा भरणार असून विधानसभेला ती संबोधित करणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close