महाराष्ट्र

आयुक्तालय दणाणले, ब्राह्मण समाजाचा आक्रोश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संघर्ष समिती पाठवणार एक लाख पोस्टकार्ड

मागण्यांचा तात्काळ विचार न केल्यास फेब्रुवारी महिन्यात मुबंईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार- संघर्ष समिती

औरंगाबाद  — ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी शुक्रवार दि.22 जानेवारी रोजी औरंगाबाद आयुक्त कार्यालया समोर ब्राह्मण संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने जोरदार पळी-ताम्हण वाजवा आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांनी आंदोलनास भेट देत समाजाच्या मागण्या रास्त असून अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरू आहे आगामी काळात मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांची तसेच राष्ट्रीय पातळीवर शिष्टमंडळाची भेट घेऊन मागण्या मान्य करून घेऊ अशी ग्वाही संघर्ष समितीस दिली.

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, के.जी.टू पी.जी.शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, पुरोहित बांधवाना मानधन सुरू करण्यात यावे, कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेक आंदोलने निवेदने सरकार दरबारी लाल बसत्यात खितपत पडली आहेत. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात 1 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत पळी-ताम्हण वाजवून सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागो नारा दिला आहे. या पळी-ताम्हण आंदोलनाचा समारोप 22 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत आंदोलन करून करण्यात आला. प्रचंड कडाक्याच्या उन्हात ताम्हण-पळी चा गजर यावेळी चालू होता. या गजराने आयुक्तालय परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाची दखल घेत शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजपा आमदार अतुल सावे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांनी आंदोलनात सहभागी होत पळी – ताम्हणाचा गजर करून समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, अनेक आंदोलने केली जात आहेत, मागण्या एकदम रास्त असून त्या पूर्ण करून घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळा सोबत भेट घेऊन मागण्यां पूर्ण करण्यासाठी सोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान या आंदोलनाची दखल तात्काळ न घेतल्यास 26 जानेवारी पासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी एक लाख पोस्टकार्ड पाठवण्यात येणार असून फेब्रुवारी महिन्यात मुबंईच्या आझाद मैदानावर मागण्या मान्य होई पर्यन्त आमरण उपोषण करणार असल्याचे यावे जाहीर करण्यात आले. आंदोलनात समाजबांधव, महिला भगिनी, युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संघर्ष समिती मुख्य समन्वयक प्रमोद पुसरेकर बीड, धनंजय कुलकर्णी केज, दिपक रणनवरे जालना, विजया कुलकर्णी, विजया अवस्थी औरंगाबाद, श्रीराम शेटे , विजय क्षीरसागर , अतुल मुथळे , गौतम बचुटे केज, अमोल जोशी, श्रीकांत धस किशोर, देशमुख , नंदकुमार डबीर, राहुल देशमुख, गणेश पांडव ,खिस्ती गणेश पाटोदा, जोशी दिगंबर पिंपरखेड जोशी योगेश चींचाला,जोशी सदाशिव वडवणी संजय रत्नपारखी वडवणी, सतीश राव देशमुख वडवणी,अशोक राव रत्नपारखी बाहेगव्हान प्रदीप राव जोशी वडवणी,धनंजय कुलकर्णी चींचला यांच्यासह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close