आपला जिल्हा

गेवराई नगर परिषद विषय समितीच्या निवडी झाल्या बिनविरोध

गेवराई — येथील नगर परिषद विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या असून, पाच सदस्यांना संधी मिळाली आहे. शुक्रवार दि. 22 जानेवारी रोजी नगरपालिका सभागृहात विषय निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक समित्यांच्या सभापतीपदासाठी एकच उमेदवारी दाखल करण्यात आल्याने, बांधकाम सभापतीपदासाठी राहुल शंकरराव खंडागळे, पाणी पुरवठा सभापती पदासाठी सौ. ज्योती आप्पासाहेब कानगुडे, महिला बालकल्याण सभापती पदासाठी हसिना महमंद युसूफ, शिक्षण सभापती सौ.रेवती भगवानराव घुबार्डे, महिला बालकल्यान उपसभापती पदासाठी आयशा सिध्दिकी याहिया खाॅन यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापती नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,व स्वच्छता सभापती म्हणून उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निडणुक आधिकारी म्हणून प्रकाश आघाव पाटील , सहाय्यक निवडणुक आधिकारी म्हणून मुख्यधिकारी उमेश ढाकणे यांनी काम पाहिले.

यावेळी सौ.गिताभाभी बाळराजे पवार, नगरसेवक काशीनाथ पवार,हासिना महमंद युसूफ, सौ.सिमा संजय ईगळे,मोमीन मोज्जम, सौ.काकडे, राजेंद्र आर्दड,सौ.काजल सौदरमल, जमील सेट, शेख फेरोज अहेमद, छगनअप्पा हादगुले,सौ.कमलबाई धोडलकर,सौ.रितु आरूण मस्के, जानमहमद बागवान,भरत गायकवाड आदीची उपस्थित होती. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे आमदार लक्ष्मण पवार , भाजपा अध्यक्ष प्रकाश सुरवसे यांनी अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close