आपला जिल्हा

महाराष्ट्र हाउसिंग कॉलनी येथील विकास कामाला नगराध्यक्षांनी दिली गती

बीड – शहरातील प्रभाग क्र १३ मधील महाराष्ट्र हाउसिंग कॉलनी येथे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या आणि परिसरातील कामांना गती दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील विकासकामे करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांना होती

. याची दखल नगराध्यक्षांनी घेतली आणि स्वतः पाहणी करून आजिंठा बौद्ध विहारात शौचालय, कॉलनी मधील रस्ता,नाली बांधकाम आदि कामे त्वरित करण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला दिल्या. यावेळी परिसरातील नागरिकांनी अध्यक्ष साहेबांचा सत्कार करून आभार मानले.
या कार्यक्रमास नगरसेवक गणेश वाघमारे,अशोक सोनवणे,सतिष गवारे,संजय धुरंधरे,जाधव ताई,साबळे ताई,नागेष तांबारे,मुन्ना गायकवाड,अमोल वाघमारे,कपिल सोनवणे,दिपक वाघमारे,सोमनाथ लाड,राहुल शिंदे,बागडे साहेब,गिराम साहेब,प्रशांत शेटे,सिरसाट सर,गालफाडे सर,आश्रुबा गायकवाड ,प्रा. ओगले,रुषीकेष गिराम,यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close