आरोग्य व शिक्षण

दहावी ,बारावी वर्गाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई — कोरोना संकटामुळे यावर्षी शिक्षण क्षेत्रात काहीसा अडसर निर्माण झाला होता मात्र यावर मात करत दहावी व बारावी च्या परीक्षांची तारीख आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे.

यावर्षी शैक्षणिक वर्षाला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे परीक्षांच्या तारखा देखील पुढे लांबणीवर पडल्या गेल्या. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेण्यात येणार आहे या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे याबरोबरच बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे या परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.अखेर आज वर्षा गायकवाड यांनी परीक्षांचा कालावधी जाहीर करुन राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दिला आहे. कोरोनाचा काळ लक्षात घेता या परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेणं अतिशय कठीण असल्याचं मत याआधीच वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागण्याची शक्यता आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close